Author Topic: बाळाची गादी  (Read 2359 times)

बाळाची गादी
« on: November 22, 2014, 02:30:16 PM »
बाळाची गादी
(८ नोव्हेंबर १९९२ च्या लोकसत्ता 'किशोरकुंज' मध्यें प्रकाशित)

छोटासा बाळ
थंड आहे लादी
बाळासाठी आणलीय 
छोटी छोटी गादी

गुबगुबीत गादीवर
बाळ झोपतो गाढ
बाळाचे करतात
सगळेच लाड

कधीकधी वाटतं
बाळाएवढं व्हावं
छोट्याशा गादीवर
मस्त पडून राहावं

"बाळाच्या गादीवर
झोपू कां मी थोडा?"
विचारलं की आई म्हणते
"तू झालास आता घोडा"

ठरवलंय मी जेव्हां
घरात एकटा राहीन
बाळाच्या गादीवर
नक्कीच झोपून पाहीन

Marathi Kavita : मराठी कविता