Author Topic: पावसा पावसा थांब थांब  (Read 2173 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
- - - - - बालगीत - - - - -पावसा पावसा थांब थांब
इथं तू पडू नको, जा थोडं लांब लांब
पावसा पावसा थांब थांब !!धृ !!

जमीन छान सुकली, खेळू दे थोडं
खेळण्यासाठी काठीचं करू दे घोडं
आंबे दिसतात छान छान आहेत फार गोडं 
खाण्यासाठी त्याला आम्हां, लाऊ दे दौड़ !
उन्हाळ्याच्या सुट्टीत मला खेळूदे जाम जाम !
पावसा पावसा थांब थांब
 इथं तू पडू नको जा थोडं  लांब लांब ! !

बघून तुला हैराण शेतकरी राजा
आनंदात वाजूदे, त्याच्या लग्नाचा बाजा
मला पण नाचण्याची करूदे मजा
भिंती आड दडण्याची नको देऊ सजा
नवरदेवा जाऊदे, गाव त्याच लांब लांब !
पावसा पावसा थांब थांब
इथं तू पडू नको जा थोडं लांब लांब ! !

उन्हाळ्याचा सारा तू पावसाळा केला
अजून तुला कसा बुवा जाग नाही आला
शाळेच्या सुट्टीचा एन्जॉय नाही झाला
थांब थोडं आता तरी खेळू दे मला ! !
मामाच गाव माझ्या आहे फार लांब लांब !
पावसा पावसा थांब थांब
इथं तू पडू नको, जा थोडं लांब लांब
पावसा पावसा थांब थांब ! !संजय बनसोडे
9819444028
« Last Edit: December 12, 2016, 02:41:31 PM by sanjay bansode »