Author Topic: बाहुली माझी छान ग  (Read 1995 times)

Offline vaishali2112

  • Newbie
  • *
  • Posts: 29
  • Gender: Female
बाहुली माझी छान ग
« on: February 28, 2010, 10:30:26 PM »
बाहुली माझी छान ग,
फिरवी गरगर मान ग

कुरळे कुरळे केस काळे
हत्ती सारखे बारीक डोळे
हात पाय इवले इवले
मोठे मोठे कान ग

बाहुली माझी छान ग,
फिरवी गरगर मान ग

काना मध्ये डूल घालती
केसा मध्ये फुल माळती
सर्वांना ती आवडते
अश्शी  गोरीपान ग

बाहुली माझी छान ग,
फिरवी गरगर मान ग

रुसत नाही फुगत नाही
खाऊ साठी रडत नाही
पैसा सुद्धा मागत नाही
असता अगदी वाण ग

बाहुली माझी छान ग,
फिरवी गरगर मान ग

बोट लावता डोळे फिरवी
ओठ दाबता गाणे गाई
मांडीवरती झोपून जाई
शहाणी माझी सोना ग

बाहुली माझी छान ग,
फिरवी गरगर मान ग

unknown........ :)
« Last Edit: March 27, 2010, 03:54:42 PM by vaishali2112 »

Marathi Kavita : मराठी कविता