Author Topic: चिऊ ताई, चिऊ ताई  (Read 2357 times)

Offline vaishali2112

  • Newbie
  • *
  • Posts: 29
  • Gender: Female
चिऊ ताई, चिऊ ताई
« on: February 28, 2010, 10:53:25 PM »
चिऊ ताई,  चिऊ ताई,
येऊ का घरात?
चिऊ ताई,  चिऊ ताई,
येऊ का घरात?
ये बाबा कावळे दादा
लवकर ये घरात!

घर माझं मोडलं
पाउसानी वाहिलं
मेणाचं घर तुझं
छान छान  राहिलं

चिऊ ताई, चिऊ ताई
झोपू मी कुठे?
चिऊ ताई, चिऊ ताई
झोपू मी कुठे?
झोप बाबा कावळे
त्या कोपऱ्या मध्ये!

कुडुम कुडुम
तू काय खातोस रे?
मुंजी ची सुपारी
मी खातो गे!

मला दे, मला दे
मला दे जरा!

संपली, संपली,
जातो मी घरा !
संपली, संपली,
जातो मी घरा !

unknown.........
« Last Edit: March 27, 2010, 03:51:29 PM by vaishali2112 »

Marathi Kavita : मराठी कविता