चांदोमामा चांदोमामा
भागलास का?
लिंबोणीच्या झाडा मागे
लपलास का?
लिंबोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी!
चांदोमामा चांदोमामा
हसतोस का?
काळ्या काळ्या
ढगा मागे लपतोस का?
लपाछपी छ्पालपी
खेळतोस का?
लिंबोणीच्या झाडामागे
लपतोस का?
चांदोमामा चांदोमामा
रुसतोस का?
एक दिवस दडी मारून
बसतोस का?
काळा कुट्ट अंधार
करतोस का?
थकून भागून
निघतोस का?
चांदोमामा चांदोमामा
झुरतोस का?
रोज रोज हळू हळू
जीझतोस का?
तूप रोटी
खातोस का?
गोल गोल गोंडस
होतोस का?
चांदोमामा चांदोमामा
भागलास का?
लिंबोणीच्या झाडा मागे
लपलास का?
लिंबोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी!
.....unknown