गुबगुबीत ससा
पण दिसतो कसा?
हिरव्या निळ्या रानी
पांढरा ढग जसा !
मन्या सारखे डोळे अन
तिखट दोन्ही कान
पळता भुई
दोन्ही घेऊन
वाजले तरी पान !
गुबगुबीत ससा
पण दिसतो कसा?
हिरव्या निळ्या रानी
पांढरा ढग जसा !
लुसलुशीत अंग
ससा स्वच्छ शुभ्र रंग
तुरु तुरु धावण्यात असतो नेहमी दंग !
गुबगुबीत ससा
पण दिसतो कसा?
हिरव्या निळ्या रानी
पांढरा ढग जसा !
गोजिरवाणे रूप ते
आवडे ज्याला त्याला
वाटे सर्वांना
घ्यावे मांडीवर ह्याला !
गुबगुबीत ससा
पण दिसतो कसा?
हिरव्या निळ्या रानी
पांढरा ढग जसा !
unknown.........