एक गाणे एक गाणे आमच्या आईचे
दुधावरच्या साईचे
एक गाणे एक गाणे आमच्या बाबांचे
गडगडत्या ढगांचे
एक गाणे एक गाणे आमच्या आज्जीचे
दोन दोन दिसणार्या चष्म्याचे
एक गाणे एक गाणे आमच्या आजोबांचे
हिंदीच्या पुस्तकाचे
एक गाणे एक गाणे आमच्या दादाचे
रंगीबेरंगी फुग्यांचे
एक गाणे एक गाणे माझेऽऽऽऽऽ
संपलेल्या कॅटबरीचे...............
..................... श्वेता