Author Topic: असावा सुंदर चॉकलेटचा बंगला  (Read 5682 times)

Offline :) ... विजेंद्र ढगे ... :)

  • Jr. Member
  • **
  • Posts: 122
  • Gender: Male
  • आभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्र!होते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र !
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला


चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
"हॅलो, हॅलो !" करायला छोटासा फोन !

बिस्कटांच्या गच्चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल

चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांशी लपाछपी खेळतो

उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला


किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

- विजेंद्र -

« Last Edit: February 25, 2011, 04:06:48 PM by vijendradhage »