चांदोमामा चांदोमामा खेळतोस का
तुझी ही बिल्डिंग सजली का
चांदण्यांची भरभराट केलीस का
मी खेळायला येऊ का
तुझी ही बिल्डिंग आठ मजली
कशी मी येऊ सांग मजशी
हात मला दे नि चल वर वर
खेळूया आपण भर भर
आता मला जाऊदे घरी
आई माझी वाट पाहते दारी
उदया ही येईल खेळाया
तुझी ही बिल्डिंग सजवायला
भावना विजय कुंजीर.