Author Topic: हट्ट गणेशबाळाचा....  (Read 1992 times)

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
हट्ट गणेशबाळाचा....
« on: February 09, 2012, 04:59:19 PM »


हट्ट गणेशबाळाचा....

गणेशबाळाचा आईकडे एकच हट्ट
"मलाही सेलफोन" धरला पदर घट्ट

"चारी हातात तुझ्या काही ना काही
कसा धरणार सेल, काही कळतच नाही"

"पितांबराला ना खिसा, मग कुठे ठेवणार ?
एक हरवल्यावर लगेच दुसरा मागणार"

"सोंड आहेना ही, अशी कानाशीही नेईल
सेल धरायची माझी बघशीलंच स्टाईल..."

बर्थ डे च्या आधीच मिळाला की सेल
गणेशबाप्पांना आता नवीनच खेळ

"हॅलो कार्तिक, गणेश कॉलिंग.."
बाप्पांचे एकदम फुल शायनिंग

(ऐटीत कार्तिकला कॉल लावला
"टचस्क्रीन भारीच आणलाय मला" )

"सुखकर्ता दु:खहर्ता"...ची वाजली धून
चमकून बघतात तर आपल्याच सेलमधून

मोदक जेव्हा आठवले आरती रिंगटोन ऐकून
सेल टाकून बाप्पा धावले सोंड उंचाऊन........

- पुरंदरे शशांक.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: हट्ट गणेशबाळाचा....
« Reply #1 on: February 10, 2012, 01:00:01 PM »
mast....

dinesh pawar

 • Guest
Re: हट्ट गणेशबाळाचा....
« Reply #2 on: March 02, 2012, 11:01:27 AM »
bhaaree kalpanaa aahe.

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: हट्ट गणेशबाळाचा....
« Reply #3 on: April 11, 2012, 03:42:30 PM »
khup chaan .... :) :D

Offline Rupesh Naik

 • Newbie
 • *
 • Posts: 39
 • Gender: Male
 • शब्द ओशाळले भाव रेंगाळले....!!शब्द तुझे भाव माझे..!!
Re: हट्ट गणेशबाळाचा....
« Reply #4 on: April 23, 2012, 06:10:20 PM »
 ;)  KHUP CHAN Ganapati bappa Moraya........................