Author Topic: देवा मला लवकर मोठ्ठं कर  (Read 2541 times)

Offline बाळासाहेब तानवडे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 160
 • Gender: Male
 • जगा आणि जगू द्या...
देवा मला लवकर मोठ्ठं कर
« on: February 24, 2012, 11:50:45 PM »
देवा मला लवकर मोठ्ठं कर
 
रोजच अभ्यास , रोजच शाळा
रोजच जाण येण येई कंटाळा
दफ्तराच वजन तु छोटं कर
देवा मला लवकर मोठ्ठं कर

अभ्यासा साठी आईची किटकिट
मस्ती बद्दल ती बाबांची मारपीट
मारकुट्या दादाचा हात घट्ट धर
देवा मला लवकर मोठ्ठं कर

News channel बाबांचं लाडकं
आईला आवडतं serial रडकं
सर्वानाच cartoonच वेड भर
देवा मला लवकर मोठ्ठं कर

दुधासवे Complan पितो घटघट
John,सलमान सारख वाढव पटपट
स्वप्नातल्या वचनाचा नको विसर
देवा मला लवकर मोठ्ठं कर
 
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २४/०२/२०१२
http://kavyarangmaze.blogspot.com/

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: देवा मला लवकर मोठ्ठं कर
« Reply #1 on: February 25, 2012, 01:54:12 PM »
hummm lahan asnata kadhi ekdache mothi hote ase vatayache ani ata mothi zali tar balapanach bare hote ase vatayala lagaley :) ..

Offline बाळासाहेब तानवडे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 160
 • Gender: Male
 • जगा आणि जगू द्या...
Re: देवा मला लवकर मोठ्ठं कर
« Reply #2 on: February 25, 2012, 07:34:10 PM »
खरं आहे संतोषीजी....
« Last Edit: February 25, 2012, 07:34:39 PM by बाळासाहेब तानवडे »

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: देवा मला लवकर मोठ्ठं कर
« Reply #3 on: February 27, 2012, 10:54:22 AM »
balasaheb tanavdeji.... khuthe hotata..... khup divsanni kavita vachayla milali..... anand zala.
 
khup chan kavita..... ata moth jhlyavar lahan vhav vattay.....

Offline बाळासाहेब तानवडे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 160
 • Gender: Male
 • जगा आणि जगू द्या...
Re: देवा मला लवकर मोठ्ठं कर
« Reply #4 on: February 27, 2012, 05:45:43 PM »
खूप धन्यवाद केदारजी , होतो इथेच.. तुमचा, संतोषीजींचा आणि इतर बऱ्याच रसिकांचा मला इशारा बरोबर समजला. मी या कवितेची reverese आवृती येत्या दिवसांत आणण्याचा प्रयत्न करणार....