Author Topic: आई आणि बार्बी डॉल..  (Read 1616 times)

Offline shashaank

  • Full Member
  • ***
  • Posts: 558
  • Gender: Male
आई आणि बार्बी डॉल..
« on: February 29, 2012, 11:50:32 AM »
आई आणि बार्बी डॉल...

    (पुरंदरे शशांक)सो नाईस बार्बी डॉल
कित्ती कित्ती फिरले मॉल

आलीये म्हणे स्टेट्सहून
मिरवते सगळ्या शॉपीतून

कसली क्यूट दिसते नं ही
वेगवेगळ्या फॅशन्स सही

मॉम मात्र चिडते फार
"कसली आलीये नटवी नार"

"कसले हिचे लांडे फ्रॉक
तुला कुणाचा उरलाय धाक ?"

चूल बोळकी भातुकली छान !!
जोडीला ते ठकी पुराण !!!

अस्सं बोअर करते ना ही
नव्याचे हिला कौतुकच नाही

"एवढं का गं रागावतेस आई ?
चल, दुसरं खेळू काही...."

हळूच माझा घेउन पापा
म्हणते "सांभाळ रे, देव बाप्पा..."

-(पुरंदरे शशांक).
« Last Edit: February 29, 2012, 11:51:43 AM by shashaank »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: आई आणि बार्बी डॉल..
« Reply #1 on: February 29, 2012, 12:32:16 PM »
khup chan,...... mast aahe.