Author Topic: गोड पावसाचे गाणे...  (Read 2564 times)

Offline shashaank

  • Full Member
  • ***
  • Posts: 558
  • Gender: Male
गोड पावसाचे गाणे...
« on: July 12, 2012, 10:17:05 AM »
गोड पावसाचे गाणे...

गडाड गुडुमसे ढगात होता
म्हातारी दळते दाणे
पावसात भिजताना गाऊ
ये रे ये रे चे गाणे

पाऊस पडता बेडुक गाती
डराँव डराँवचे गाणे
वा-यावरती नाचत येते
थेंबाथेंबांचे गाणे

थेंब टपोरे धावत येती
सरसरसर गाती गाणे
अंगणात मग फेर धरुनी
आम्हीही गातो गाणे

पावसात भिजताना गाऊ
गोड पावसाचे गाणे
हिरवी हिरवी होती शेते
कणसांचे गाती गाणे.......

-shashaank purandare.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: गोड पावसाचे गाणे...
« Reply #1 on: July 12, 2012, 10:38:59 AM »
mast kavita... lahan zalya sark vatl.