Author Topic: आला आला पाऊस आला  (Read 2276 times)

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
आला आला पाऊस आला
« on: July 30, 2012, 11:19:42 AM »
आला आला पाऊस आला

    (पुरंदरे शशांक)

आला आला पाऊस आला गातो थेंबांचे गाणे
मनात माझ्या नाचत येते खमंग कणसाचे गाणे

गडगड गडगड मेघ गरजती सळसळसळ पाऊस गाणे
अंगणात या वेचायाला बर्फाचे गंमतदाणे

चिंब भिजूनी ओले होता आईचे किती ओरडणे
चहा आल्याचा मजेत घेता जराजरासे फुर्फुरणे

झाडे, पाने, फुले न्हाऊनी डोलतात किती गंमतीने
मीही गातो, उड्या मारतो, गोल गोलसे भिर्भिरणे......

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: आला आला पाऊस आला
« Reply #1 on: July 31, 2012, 10:47:40 AM »
mast mast kavita
 

Offline atulmbhosale

 • Newbie
 • *
 • Posts: 48
Re: आला आला पाऊस आला
« Reply #2 on: September 04, 2012, 10:11:52 AM »
शशांक,
       khooooop chan.

    तुमच्या बऱ्याच कविता मी वाचल्या. फार छान लिहिता तुम्ही. बालगीत या विभागातील तर तुमच्या कवितांची संख्या आणि विशेष म्हणजे गुणवत्ता हि लक्षणीय आहे.

    कमीत कमी शब्दात, अवघड वाटणार नाही असे लहानांसाठी लिहिणे हि फार अवघड गोष्ट आहे. तेच अवघड काम तुम्ही सहजतेने पेलता. मला फार आवडल्या सर्व कविता, असेच लिहित राहावे.

     अतुल भोसले

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
Re: आला आला पाऊस आला
« Reply #3 on: September 04, 2012, 03:37:36 PM »
Thank you very much, Kedaar...

Dear Atul - Thanks a lot for appreciation..... I write these poems because I enjoy while writing such poems......