Author Topic: आले बाप्पा मोरया रे....  (Read 2106 times)

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
आले बाप्पा मोरया रे....
« on: September 17, 2012, 11:08:03 AM »
गंमत जम्मत
धमाल की रे
आले बाप्पा
मोरया रे

तामणात का
पाटावरती
मिरवत आले
आले आले
बाप्पा आले

चकाचक हे
घर झाले रे
सजले सारे
मखर पुन्हा रे

फुले नि दुर्वा
आणू या रे
मोदक सुंदर
वा रे वा रे

मंत्र स्तोत्रे
पाठ करु रे
करु आरती
मिळूनी सारे

नकला गाणी
किती किती रे
नाटुकले पण
हवेच की रे

उत्सव मोठा
बाप्पांचा रे
नवलाईचे
दहा दिवस रे

असेच न्हेमी
येत रहा ना
गणपती बाप्पा
मोरया रे
मोरया रे मोरया रे....

- shashaank purandare.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: आले बाप्पा मोरया रे....
« Reply #1 on: September 17, 2012, 04:32:32 PM »
गणपती बाप्पा मोरया

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: आले बाप्पा मोरया रे....
« Reply #2 on: September 24, 2012, 11:02:08 PM »
सर्व कविता, बालगीत छान आहेत .एक  सदर शाशांकची बालगीत म्हणून करायला हरकत नाही