Author Topic: बागेत गेलं हत्तीचं पिल्लू...  (Read 2443 times)

Offline shashaank

  • Full Member
  • ***
  • Posts: 558
  • Gender: Male
बागेत गेलं हत्तीचं पिल्लू...

हत्तीचं पिल्लू गेलं नाचत बागेमधे
खेळत होती मुलं तिथे, खूप खूप मजेमधे

झोपाळा, घसरगुंडी, जंगलजीम पाहून
हे खेळू का ते खेळू, दमले विचार करुन

झोपाळ्यावर बसताच, आला की तो खाली
घसरगुंडी तर काय, पार पार सपाट झाली

सी-सॉवर ठेवताच पाय, फळी गेली मोडून
पिल्लू बिचारे रुसले, नि बसले कोपर्‍यात जाउन

मुलं म्हणाली सोड रे, लपाछपी मस्त खेळू
लप पटकन कुठे तरी आलाच तो बघ मागे बाळू

झाडामागे लपे आपले पिल्लू साधे भोळे
पुढुन दिस्ते सोंड, तर मागे आंग सग्ळे

पिल्लावर आले राज्य, मिटले त्याने डोळे
दोन मिण्टात शोधून सगळे भिडू बाद केले

फेर धरला सगळ्यांनी पिल्लाभोती छान
सोंड छोटी उंचाऊन, पिल्लू घेई तान

चला आता खाऊया आईस्क्रीम गारेगार
गाडीभोवती जमली मग गर्दी फार फार

एक एक कोन हाती घेऊन मुले खूष खूप
पिल्लू उचले मोठ्ठा डब्बा - हा तर माझा स्कूप...


-shashaank purandare.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: बागेत गेलं हत्तीचं पिल्लू...
« Reply #1 on: October 08, 2012, 12:59:14 PM »
ha ha ha.....