Author Topic: सोनू  (Read 2101 times)

Offline Tushar Kher

  • Jr. Member
  • **
  • Posts: 78
  • Gender: Male
    • हिन्दी रचनाएँ
सोनू
« on: October 11, 2012, 12:40:24 AM »
« on: October 08, 2012, 10:20:55 PM »

आमची सोनू
गोरीगोरी पान
नवनवीन कपड्यात
दिसते छान।
सोनू जवळ आहेत
बाहुली नि बाहुला
विमान, मोटर, गाड़ी
सारे च तिला हवी
असतात खेळायला ।
रोज नवीन फ्रोक
तिला हवा असतो घालायला
आज पिंक  सोनू  तर
उद्या ब्लू सोनू
म्हणा म्हणते मला।
सोनू चा असा
असतो थाट
बसायला हवा असतो तिला
आई बाबां च्या मांडी चा पाट ।
बाबांशी कधी
गट्टी फू करते
आईला ही बाबांशी
बोलू नको म्हणते ।
अशी ही  सोनू
अवखळ भारी
सर्वांची आवडती
घरी अन दारी।
आमची सोनू
फार च गोड
तिला खड़ी साखर
म्हणू की संत्र्या ची फोड़ ।

Marathi Kavita : मराठी कविता


Offline swara

  • Jr. Member
  • **
  • Posts: 226
  • Gender: Female
Re: सोनू
« Reply #1 on: December 14, 2012, 12:00:32 PM »
chan yamak julalay
mast  :)  :)