Author Topic: !! दिंडी !!  (Read 1095 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,270
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
!! दिंडी !!
« on: June 21, 2014, 06:23:56 PM »


हाती पताका भगवी
कपाळी अबीर, गळा तुलसी मला,
भक्त दर्शनाचा भुकेला
विसरुनी देहभान, पंढरी चालला !!

जडले मन भगवंता
राहिले नं चित्त, भान संसाराचे,
ऐसा महिमा विठूचा
केवळ ध्यान, आता सावळ्याचे !!

चाले भक्ततांडा अखंड
झेलुनिया उन, पाऊस वारा,
विसरतो कष्ट वारकरी
दर्शने मात्र, विठ्ठल गोजिरा !!

टाळमृदंग, नामाचा गजर
माऊली, तुकयाची अवीट ओवी,
जाणाया भक्तांची मांदियाळी
एक तरी दिंडी अनुभवावी !!


© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता