Author Topic: !! भय दुःखांचे !!  (Read 903 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,270
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
!! भय दुःखांचे !!
« on: November 11, 2014, 12:34:09 PM »


दुःखांनो या, या परतुनी
मजला नशा तुमची हवी,
सोसले खूप ज्यांनी तूम्हा   
त्यांची जरा सुटका व्हावी।

भोग तूमचे, माझे सारखे
दयायचे तूम्ही, मी घ्यायचे,
सहन कराल कितीक काळ 
जीवन माझे धुम्र वलयांचे?

शाश्वत अस्तित्व जरी तुमचे
परी मोक्ष तुम्हास नाही,
परमार्थ करता समीप मानवा
भय दुःखांचे उरत नाही।


©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता