Author Topic: भावपूजा !!  (Read 919 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
भावपूजा !!
« on: March 03, 2014, 05:35:59 PM »
त्या तुझिया चिंतनात,
शब्दफुले मज वाहू दे,
तव नामात दंग होऊनी
तव कीर्तनात नाचुदे,

सावळे ते रूप तुझे,
शब्द रंगात रंगवु दे,
शब्दात रंगलेले रूप तुझे,
मज ह्रिदयि साठवू दे,

शब्द टाळ वाजवुनी
भजनात तुझ्या गुंग होवू दे,
नाम तुझे घेता घेता
शब्द माझे "नाम" होवू दे,

एक एक शब्द घेवूनी,
शब्दमाला गुंफू दे,
शब्दमाला तुज अर्पुनी
तव चिंतनात रंगू दे,

शब्द फुलांची "भावपूजा" हि,
गोड मानुनी अर्पू दे,
शब्दरूपी "नाम" घेता घेता,
अखंड नाम तव चरणी राहू दे,

स्वरचित : श्री प्रकाश साळवी

[/b]

Marathi Kavita : मराठी कविता


ogale ajay

  • Guest
Re: भावपूजा !!
« Reply #1 on: March 03, 2014, 07:35:17 PM »
khuph chhan