Author Topic: पांडुरंगा तुझ्या दर्शनाची आस..!  (Read 468 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
पांडुरंगा तुझ्या दर्शनाची आस
निघालासे वारकरी पंढरीस

दिंडी ती चालली गजर भक्तिचा
सवे निनाद तो टाळ-मृदुंगाचा

तुझ्या नामाचा जयघोष चालला
संत सज्जनांचा सहवास लाभला

तुझे पंढरपुर माझे ते माहेर
ओढीने मन झालेसे कातर

एकवेळा तुज डोळा भरुन पाहीन
मनुष्यजन्म माझा सार्थक होईन

तुझ्या पायावरी टेकेन हा माथा
तूचि रे एक माझा जग विधाता
--- राजेश खाकरे
Mo.7875438494