Author Topic: ध्यान (ओशोची पत्र कविता)  (Read 839 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
ध्यानातून काहीही मिळवायची
“आकांक्षा ”
सर्व प्रथम मनातून काढून टाका  .
अगदी सहज पणे ध्यान करा .
जे घडायचे ते घडू द्या  .
एक दिवस अगदी सहज
सारे काही घडू लागेल.
प्रयत्नांनी ध्यान कधीच होत नाही .
खरतर ,
प्रयत्न हाच अडथळा असतो
प्रयत्नात आणि अभ्यासात
एक प्रकारचा तणाव असतो
एक प्रकारची अपेक्षा असते
अगदी शांतीची अपेक्षा सुद्धा
अशांती निर्माण करते
हा तणाव जायला हवा.
ज्या क्षणी हे पटते
दैवी शक्तीचे अवतरण होते.
“मी हे करतो”
हे वाटणेच थांबवा.
त्या ऐवजी अनुभूत करा.
मी मला, स्वत:ला
त्याच्या हवाली करत आहे.
हेच समर्पण आहे.
स्वत:चे संपूर्ण समर्पण करा.
जेव्हा हे कराल तेव्हाच
अगाध रिक्त्ततेच प्रवेश होईल.
शरीर आणि श्वास शांत होईल.
तुम्ही म्हणाल ,
“हे तर मनाने सुद्धा घडते!”
पण जेव्हा मन जाते,
तेव्हा जे घडते,
ते अवर्णनीय असते. 

विक्रांत प्रभाकर

« Last Edit: April 19, 2014, 01:20:18 AM by MK ADMIN »