Author Topic: प्रवास (नर्मदाकाठच्या कविता )  (Read 798 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
सर्वदूर केवळ
पाण्याची खळखळ
अन पायाखाली
पाचोळ्याची सळसळ 
कुणीही नाही
आजूबाजूला
अथवा कुणाची
चाहूल कानाला
किती चालायचे
माहित नाही
किती चाललोय
माहित नाही
मनाला त्याची
मुळी शुध्दच 
उरली नाही
पोहोचणे किंवा
न पोहोचणे यास
जणू आता
काही अर्थच
उरला नाही
अस्तित्वाच्या
कणाकणात
विरघळलेली
तुझी साथ
श्वासाच्या
अंतापर्यंत
हवी हवीशी
वाटणारी ..
थबकली पावुले
वाटले मनास
इथेच हा पथ
संपावा प्रवास

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: April 19, 2014, 12:40:00 AM by MK ADMIN »