Author Topic: सकाळ (नर्मदाकाठची कविता )  (Read 1002 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550

हिरवळी पानावर
काळसर मातीवर
इवलाले दवबिंदू
कोळीयांच्या जाळीवर
 
ओल साऱ्या झाडावर
किनारी दगडावर
जलपऱ्याची पावुले
उमटली फुलावर

पाण्यामधून धूसर 
धुके जात होते वर
श्वासातील उष्ण बाष्प
थंडगार वाऱ्यावर

झोतामध्ये तीक्ष्ण शीत
होती पण उबदार 
माईची सोबत अन 
हात सुन्न हातावर
 
विक्रांत प्रभाकर
« Last Edit: April 19, 2014, 12:23:44 AM by MK ADMIN »