Author Topic: * पंढरीची वारी *  (Read 2018 times)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
* पंढरीची वारी *
« on: July 30, 2013, 07:51:41 PM »
* पंढरीची वारी *
===========
बदलले जग
बदलली दुनिया सारी
बदलली नाही ती
पंढरीची वारी ……

तीच ती दिंडी
तीच ती भक्ती
पाऊले चालती
पंढरीच्या दारी…. बदलले जग ….

मनी आस विठूची
नयनी त्याचीच मूर्ती
ऊन , पावसाची ना पर्वा
विठूची किमया सारी …. बदलले जग ….

मुखी विठूचा गजर
हात टाळ वाजविती
कुठे दिसे तुळस
भगिनीच्या डोक्यावरी …. बदलले जग ….

किती वर्णू महिमा
पंढरीच्या वारीचा
लोटे जन सागर
आषाढे पंढरपुरी ….

बदलले जग
बदलली दुनिया सारी
बदलली नाही ती
पंढरीची वारी .

---------------------------

संजय एम निकुंभ , वसई
दि . २८ . ७ . १३ वेळ : ७ . ५० स.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: * पंढरीची वारी *
« Reply #1 on: August 03, 2013, 06:56:44 AM »
Apratimmm...

Offline vijaya kelkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 314
Re: * पंढरीची वारी *
« Reply #2 on: September 01, 2013, 06:53:57 PM »
  अप्रतिम वारीचे दर्शन

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
Re: * पंढरीची वारी *
« Reply #3 on: September 13, 2013, 12:25:39 PM »
thanx prajunkush