Author Topic: एकच नाम सतत  (Read 839 times)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
एकच नाम सतत
« on: February 23, 2013, 04:29:23 PM »
एकच नाम सतत l  माझिया हृदयात l
आता आहे स्फुरत  l  श्री दत्त जय दत्त ll १ll 
माझे मन हासत l  आहे मजला सांगत l 
श्री दत्त स्मरणात l  सुख वाटे ll २ll 
पातलो समाधान l  शांतीचे वरदान l
लाभता निधान l  श्री दत्त प्रेमाचे ll३ ll
 
विक्रांत प्रभाकर 

http://kavitesathikavita.blogspot.in/
 
« Last Edit: February 23, 2013, 04:31:51 PM by विक्रांत »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: एकच नाम सतत
« Reply #1 on: February 23, 2013, 09:45:32 PM »
पातलो >>>> तुम्हाला 'पावलो' म्हणायचे आहे काय? या ऐवजी 'जाहले' असे छान वाटेल.
बाकी फारच छान!

मला पण एक पंक्ती सुचली....

जो जो  आहे दुखी:| ठेवा देव नाम मुखी|
तोच जगी सुखी | झाला आहे||

जमली का भाऊ?

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: एकच नाम सतत
« Reply #2 on: February 24, 2013, 07:22:28 PM »
मधुराजी ,धन्यवाद .पातलो हा शब्द पावलो या अर्थाचाच आहे .अनेक अभंगात तो असाच वापरलं गेला आहे .
आणि बहिणाबाई अभंग जमू लागलेत बर का !

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: एकच नाम सतत
« Reply #3 on: March 02, 2013, 01:22:43 PM »
Thanks !