Author Topic: ---- मला पामरा दत्त शक्ती कळु दे -------  (Read 856 times)

Offline Ambarish Deshpande

 • Newbie
 • *
 • Posts: 13
मनी वासना षड्रिपूंची गळु दे
अशी सार्थ वरदान भक्ती मिळु दे
कुणा आकळे श्रीगुरुचा महीमा
मला पामरा दत्त शक्ती कळु दे


तुझ्यावीण कोणी न होता न आहे
सुखी नेत्र ते पादुका दोन पाहे
जिच्या दर्शनी पाप सारे पळु दे
मला पामरा दत्त शक्ती कळु दे


भजा नाम श्रीपाद श्रीवल्लभाचे
कसे पाहती मुख ते संकटाचे
जसे आलीया पाउली ते वळु दे
मला पामरा दत्त शक्ती कळु दे


अंबरीष देशपांडे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
श्री गुरुदेव दत्त

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
 :) सुंदर ,वृत्त आणि भावना ,  छान .