Author Topic: नील कल्लोळी...  (Read 798 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
नील कल्लोळी...
« on: September 04, 2013, 11:02:33 PM »
काल घरी संध्याकाळी
आला तो वनमाळी ग
लगट त्याने करता
भुलले भोळी बाई ग

करू नये ते केले मी
निळ्या मिठीत गेले ग
कसे सांगू सखे आता
मी न ती उरले ग

माहित होते तरीही
जाळ्यात मी पडले ग
निळ्या निळ्या आकाशात
निळे पाखरू झाले ग

निळेपणी झपाटले
विश्वच निळे झाले ग
झोप निळी जाग निळी
स्वप्न हि निळे निळे ग

तू हि निळी दिसे मज
मीही केवळ निळी ग
निळे झाले बोल गेले
भान नील कल्लोळी ग

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: April 19, 2014, 12:55:56 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता