Author Topic: भक्तगणांनो नीट समजा माझा अवतार ।  (Read 1014 times)

Offline Suhas Phanse

  • Newbie
  • *
  • Posts: 15
  • Gender: Male
  • आपले स्वागत आहे.
    • Suhas Phanse's Creations
 
आपण आरती करून प्रसाद दिल्यावर
गणपती बाप्पा काय म्हणतात ,
ते माहित आहे का?
भक्तगणांनो नीट समजा माझा अवतार ।
भक्तगणांनो नीट समजा माझा अवतार ।
आनंदी अन खुशाल होईल तुमचा संसार ॥धॄ॥
अनंत तुमची पापे खाउन झालो लंबोदर ।
लोळण घेता माझ्या पायी पापे केल्या नंतर ॥
पाप्यांचे कधि विघ्न हरण मी नाही करणार ।
भक्तगणांनो नीट समजा माझा अवतार ॥१॥
दुष्किर्तीचे तुमचे डंके ऐकू येण्यासाठी ।
गजकर्ण घेतले विशाल मागून मी हो माझ्यासाठी ॥
पाप्यांचा कर्दनकाळ असे मी हाती तलवार ।
भक्तगणांनो नीट समजा माझा अवतार ॥२॥
सुहास फणसे
                   ***
 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline vijaya kelkar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
   छान,आणि एकदम बरोबर