Author Topic: माझा गणेश  (Read 1079 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
माझा गणेश
« on: September 09, 2013, 01:56:10 PM »
माझा गणेश …………………संजय निकुंभ
========
माझा गणेश माझ्या
सोबतीस रहातो
प्रत्येक क्षणी हृदयात
त्यास मी पहातो

श्वासांत गणेशाचा
गंध नित्य वहातो
मिटून पापण्यांना
त्यास मी अनुभवतो

मस्तक फक्त त्याच्या
पायी मी झुकवतो
तो हि नित्य माझ्यावरी
कृपा करीत रहातो

हक्काने मी त्याच्याशी
कधी कधी भांडतो
घडायचे ते घडणारच
मला तो समजावतो

आहे मी सगळ्यांचा
तो मज सांगतो
जात , धर्माचे वावडे
त्यास माणूस आवडतो

असेलही तो देव
सखा मज वाटतो
माझा गणेश माझ्या
सोबतीस रहातो .
----------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि. ९ . ९ . १३ वेळ : १० . १० स.

Marathi Kavita : मराठी कविता