Author Topic: तुला निरोप देताना गणराया ……  (Read 1250 times)

Offline Mayur Jadhav

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
  • Gender: Male
  • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
तुला निरोप देताना गणराया ……

तू येणार म्हणून गणराया
होतो आम्ही आतुर ,
मग तू जाताना का मनाला
लागते ही हुरहूर ,
तू आल्यावर गणराया
आनंदात बुडवतोस आम्हाला ,
मग तू निरोप देताना वर्षभर
थांबा का म्हणतोस आम्हाला ,
तुला आणताना गणराया खूप
उत्साहात असतो आम्ही ,
मग तू जातानाही पुढच्या वर्षी येणार आहेस
या विश्वासात नाचतो  आम्ही ,
तुला निरोप देताना बाप्पा गणराया
हृदय भरून येते हे ,
मग तुझ्या जल्लोषाने
भरलेले हृदय मोकळे करतो आम्ही .

+918888595857 ,
मयुर जाधव ,
कुडाळ (सातारा)