Author Topic: श्री गणेशाचे आगमन  (Read 1424 times)

Offline BLMelkari

  • Newbie
  • *
  • Posts: 6
श्री गणेशाचे आगमन
« on: October 31, 2013, 10:55:10 AM »
श्री गणेशाय नमः

श्री गणेशाचे झाले आगमन 
फुलासारखे उमलले आम्हा सर्वांचे मन

घेवूनी आले उंदीर मामा, बाप्पांना
हे बाप्पांचे सारथी
भरपूर आनंदात आम्ही करतो श्रींची आरती

धूप, कापूर, दिवा,अगरबत्ती,हार,दुर्वा
बाप्पा म्हणे मला मोदक अरे पूर्वा

फक्त दहा दिवस बाप्पांचा आपल्याकडे असतो मुक्काम
वर्षभर पुरेल एवढे आशीर्वाद देवून ठेवतात ते मुद्दाम

येता येता असते त्यांची जाण्याची घाई
आठवणींची साठवण आमच्या मनी ते सोडून जाई

मोरया मोरया गणपती बाप मोरया

बाबासाहेब एल मेलकरी
९०११०४९७८४

Marathi Kavita : मराठी कविता