Author Topic: श्री दत्त कृपाळू दाता  (Read 1297 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
श्री दत्त कृपाळू दाता
« on: November 18, 2013, 03:11:44 PM »
श्री दत्त कृपाळू दाता
मज धरुनिया हाता
झाला मार्ग दाखविता
अतिप्रेमे ||
मी बोलविता धावला
तू असशी माझा वदला
मम हृदयाकाशी बैसला
विराजुनी सदा ||
त्या चुकल्या वळणावरती
जग तुटल्या कड्यावरती
ती होती मजवर प्रीती
म्हणुनी जगलो ||

विक्रांत प्रभाकर

« Last Edit: April 19, 2014, 12:35:20 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता