Author Topic: माऊलीची कृपा...  (Read 1137 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
माऊलीची कृपा...
« on: February 04, 2014, 11:35:23 PM »
पांडुरंग पांडुरंग
स्वत:शी म्हणत
पोर गोलगोल
होती नाचत

माऊलीची कृपा
माझ्या मनात
माझ्या घरात
होती वर्षत

अंगण अवघे
राऊळ झाले
अबीर गंधात
कोंदाटले

कृतज्ञ अंतर
दाटून आले
भरले डोळे
शब्द उमटले

तुझीच देवा
मी सांभाळली
करितो पुन्हा
तुझ्या हवाली

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: April 19, 2014, 12:29:46 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता