Author Topic: विठ्ठलाचा अभंग ...  (Read 1248 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
विठ्ठलाचा अभंग ...
« on: May 30, 2014, 03:48:46 PM »

      विठ्ठलाचा अभंग ...


संसारावर ठेवून तुळसीपञ,
वेडी झाली माय माऊली..
विठ्ठलाच्या शोधात निघाली
ती रे पंढरपूरी ।
ह्रदया मध्ये विठू तिच्या
ओठावर नाम घोष हरीचा ।
संसारामध्ये नाही राहीले,
चित्त तीचे आता ।
वेडी झाली माय माऊली,
जय जय विठ्ठल रूक्माई ।।१।।
पाय़ी निघाली पंढरपुरी
तुळसीवृदांवन घेवूनी डोक्यावरी ।
हरी नामाचा जयघोश तीचा ,
थाबंनार नाही कधीही ।।
जय जय विठ्ठल रूक्माई ।।२।।
टाळ,मृदंग आणी पताका घेऊन,
वारी निघाली पंढरपुरी ।
विठूनामात वेडी झाली
माझी माय माऊली ...
मोह नाही शरीराचा
सोहळा नाही कधी तयाचा,
वैभव तीचे पढंरपूरी ।
माता वेडी झाली हरिनामी ,
जय जय विठ्ठल रूक्माई ।।३।।
आनंदाने गाऊन अभंग
द-या खो-यातून वाट काढून
घरसंसाराला ती विसरली ।
ओढ लागली हरी भेटीची
भूक तहान ती विसरली,
माता हरी नामात
रंगून आज गेली ।
येरे येरे विठूमाऊली
नको अंत पाहू तयाचां ।
वाटेवरून जाताना,देवदुत बनूनी तयाचां,
क्षणात काटूदे वाटा...
भेटतू जिवलगा,
विठूनामात रंगली माय माता
विठूनामात वेडी झाली माता ।
जय जय विठ्ठल रूक्माई ।
जय जय विठ्ठल रूक्माई ।।

          सोनाली पाटील.

Marathi Kavita : मराठी कविता


prafull p. dakhole

  • Guest
Re: विठ्ठलाचा अभंग ...
« Reply #1 on: June 09, 2014, 09:52:41 AM »
Khup chyan