Author Topic: पालखी  (Read 891 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
पालखी
« on: June 20, 2014, 03:01:11 PM »पालखी निघाली प्रेमाची ।
पालखी निघाली विश्वासाची,
टाळ मृदंगाच्या गजरात,
भाव भक्तीच्या विश्वात ।
नाही भेद कसला येथे,
सोहळा फक्त आनंदाचा ...
जो तो भाव भक्तीचा भुकेला
विठू कना कनात वसला ।
पाऊले पडती पंढरपुरी ,
विठू त्यांचा पाठी राखी ।
सेवा करती भक्त जना,
विठू टाकती वाटेवरूनी
मखमली फुलांचा सडा...
मुखाने एकची बोला,
जय जय विठू माऊली..
जय जय विठू माऊली।।
संताचा मेळा वैकुंठीयेचे दारी
स्वागतास ऊभी
विठू माऊली पंढरपुरी...
जय जय विठू माऊली।।
चंद्र भागेच्या तीरी ,
तहान भागवी वारकरी ।
युगे युगे रे होत आहे,
दिपोत्सव साजरी...
जय जय विठू माऊली।।
भाव भक्तीच्या सागरात
विठू निवास करी ।
तुळसी माळा घालूनी तुला,
सौख्य लाभूदे भक्तजना ।...
सदैव आनंदात राहूदे रे तुझे वारकरी ।
जय जय विठू माऊली।।
जय जय विठू माऊली।।
« Last Edit: June 20, 2014, 04:23:14 PM by SONALI PATIL »

Marathi Kavita : मराठी कविता