Author Topic: दींडी चालली...  (Read 853 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
दींडी चालली...
« on: July 04, 2014, 08:02:20 PM »
टाळ मृदुंगाची साथ
मुखी हरी नामाची हाक
निघाली दींडी पायी पायी
येथे न लाजती राव रंक

ध्यास विठू माऊलीचा
रखुमाई विठूरायाचा
नाचू गाऊ आनंदे
काय वर्णू सोहळा किर्तनाचा

जशी माय वाहे गोदा गंगा
पंढरपूरी वाहे चंद्रभागा
तूझ्या दर्शनाची लागे ओढ
कधी भेटशी रे पांडूरंगा?

दींडी चालली चालली
गोडी विठ्ठल नामाची लागली
ना देहाला शिण भाग
दींडी विठूरायाची चालली

श्री. प्रकाश साळवी दि. 4-जूलै 2014

Marathi Kavita : मराठी कविता