Author Topic: पालखी चालली  (Read 874 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
पालखी चालली
« on: July 18, 2014, 11:11:15 PM »
अवघा बाजार
चेंगराचेंगर
मिळे पायावर
क्षण मात्र ||१
पेटके पायात
गचांड्या दारात
अशी यातायात
घडे खरी ||२
मेंढरांचा देव
मेंढरांचा भाव
डोळीयांना ठाव
मोल परी ||3
जपणे देहाचे
रडणे मनाचे
कळले कुणाचे
काय असे ||४
सुटता सुटले
धरता धरिले
अवघे कोंडिले
मीच मला ||५
जयाने पाहिली
तयास कळली
पालखी चालली
माऊलीची ||६

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: July 19, 2014, 07:02:49 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता