Author Topic: देवा माझे मन  (Read 938 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
देवा माझे मन
« on: October 23, 2014, 05:21:39 PM »
देवा माझे मन
नकोस नाकारू
उनाड बाजारू
म्हणूनिया ||
करी झाडलोट
सडा संमार्जन
रांगोळी काढून
ठेवे जरी ||
येते वावटळ
कळल्या वाचून
सारे विस्कटून
जाते पुन्हा ||
तुझाच गोपाळा
केवळ आधारू
सांभाळी वासरू 
उधळले ||
;D
विक्रांत प्रभाकर 
« Last Edit: October 24, 2014, 11:20:28 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता