Author Topic: किती मारल्यात बोंबा  (Read 845 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
किती मारल्यात बोंबा
« on: December 06, 2014, 07:52:05 PM »
किती मारल्यात बोंबा
देवे ऐकल्याच नाही
जन्म वाहुनिया पायी
माझा म्हटलाच नाही

मठा हाटात बैसला
सोन्या चांदीत नटला 
देव असेल का माझा
प्रश्न मलाच पडला

टाळ पडतात कानी
आत मृदुंग दणाणे
हवे कशाला ऐकाया
सारे बधीर मनाने 

काय कमी भक्त तुज 
तुझा भरला गाभारा
जातो माझ्या मी वाटेने
आता दत्त दिगंबरा

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: December 10, 2014, 04:21:54 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता