Author Topic: चक्रपाणी  (Read 537 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,258
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
चक्रपाणी
« on: January 04, 2015, 01:54:47 PM »
चक्रपाणी

आला मुरारी वाजवीत पावा
नाद वेणूचा घुमला वनी,
रोमांचात न्हाली सारी सृष्टी 
उमटला थरार तो पानोपानी !

आतुरले वनचर नादमय झाले
गाई, खिल्लारे दौडली झणी,
राहील कशी वेगळी बावरी
दंगली राधा सावळया ध्यानी !

वेडया राधेला ध्यान कृष्णाचे
ज्ञान प्रेमाचे उमगले जनी,
माया श्रीहरीची उरे चराचरी
राहो चिरंतन मनी चक्रपाणी !

©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता