Author Topic: जीवनाचा शोध  (Read 812 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
जीवनाचा शोध
« on: January 17, 2015, 11:29:21 PM »
जीवनाचा शोध घेवून
मन गेले आहे थकून
अनुत्तरीत प्रश्नामधून
प्राण गेला आहे पिंजून

तरीही  प्रत्येक क्षणामधून
उमटत आहे एकच धून
विचारे जी फिरून फिरून
कोण कोण रे तू कोण
 
धडपडणारा एकच प्रश्न
उत्तर येती लाख कुठून
लाख बुडबुडे पाण्यामधून
येती अन जाती फुटून

परंतु अंतर दुगंभून
यावे वाटते ते न येवून
तेच उरी पिसाटलेपण
घेवून चाले अतृप्त जीवन

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: January 18, 2015, 05:15:48 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता