Author Topic: पाठीराखा  (Read 655 times)

Offline गणेश म. तायडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 195
  • Gender: Male
  • ॥लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी॥
    • ganesh.tayade
पाठीराखा
« on: February 13, 2015, 09:01:34 AM »
देवा तुझ्याविना माझा नाही कोणी राखा,
तुच माझा सवंगडी अन् तुच माझा सखा...
देवा तुझ्याविना माझा नाही कोणी वारी,
तुच माझा पाठीराखा अन् तुच माझा कैवारी...
देवा तुझ्या चरणी झुकवितो माझे शिर,
तुच माझ्या जगण्याचे कारण अन् तुच धिर...
देवा तुझ्याविना माझा नाही कोणी मायबाप,
रखुमाई माझी माय अन् विठोबा माझा बाप...
देवा तुझ्या दर्शनासाठी झुरले माझे प्राण,
देऊन दर्शन कर संतुष्ट माझे आतूर मनं...
देवा तुझ्याविना माझा नाही कोणी राखा,
तुच माझा सखा अन् तुच पाठीराखा...
देवा तुच पाठीराखा...

- गणेश म. तायडे
   खामगांव
  ganesh.tayade1111@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता