Author Topic: प्रकाश पाझर जन्म व्हावा  (Read 460 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
गढूळल्या देही
गढूळले मन
गढूळ जीवन
जात आहे ||

गढूळ मनाच्या
गढूळ आकांक्षा
गढूळल्या दिशा
झाल्या साऱ्या ||

मिळावा प्रसाद
तुझिया प्रेमाचा
अर्थ जीवनाचा
कळो यावा ||

सरो साचलेला     
अवघा अंधार
प्रकाश पाझर
जन्म व्हावा ||

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: March 17, 2015, 11:14:30 AM by MK ADMIN »