Author Topic: का रे देवा तुला माझा बाटं ?  (Read 494 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
एक अस्पृश्य स्त्री देवाला बोलत होती ?


तुझ्याशी माझ, भक्ताच नातं   
तुझ्यासाठी केलं, माझ्या रक्ताच ताटं
मंग का रे देवा, तुला माझा बाटं ? !!

स्पर्शाने माझ्या, तुझा होतो बाटं
ना मिळे प्रवेश, तुझ्या मंदिरा आतं
लांबूनच जोडी, मी तुला हातं
मंग का रे देवा, माझा तुला बाटं ? !!

जनावराच्या मूत्राने, तु होतो शुद्ध
माझ्या स्पर्शाने, का तु अशुद्ध
जातवाद्याचिच दिसे, तुझ्या मंदीरात लाटं
म्हणूनच का रे देवा, तुला माझा बाटं ? !!

भोवती तुझ्या ही, कसली मायाजाल
तुझ्या लाडक्या भक्तासारखे, माझेही रक्त लाल
तुला भेटण्यास का, अडविती माझी वाटं
असा कसा रे देवा, माझा तुला बाटं ? !!


कवी - संजय बनसोडे
9819444028