Author Topic: सोहळा भक्तीचा  (Read 489 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,260
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
सोहळा भक्तीचा
« on: July 14, 2015, 06:37:05 AM »
सोहळा भक्तीचा

विठ्ठल सावळा
भक्तां त्याचा लळा
तेची रूप डोळा
भक्तांचिया...!!१!!

वाळवंटी रंगे
भक्तीचा सोहळा
पाहे सुक्ष्म डोळा
पांडुरंग...!!२!!

रखुमाई वरा
तुलसीच्या माळा
शोभतसे गळा
तुज मात्र...!!३!!

तुच माय बाप
आम्हा लडिवाळा
तु दीन दयाळा
पांडुरंगा...!!४!!

घ्यावे तुची उरी
जाणोनिया बाळा
अंतरीच्या कळा
अज्ञानाच्या...!!५!!

तुज दारी आला
मुढ भक्त भोळा
व्हावी भेट गळा
म्हणे शिवा...!!६!!

© शिवाजी सांगळे
« Last Edit: July 16, 2016, 11:08:13 PM by शिवाजी सांगळे »

Marathi Kavita : मराठी कविता