Author Topic: ।। मोह ।।  (Read 660 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,257
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
।। मोह ।।
« on: August 16, 2015, 04:23:02 PM »
।। मोह ।।

जन्मासी पुरेना
माय बाप कोणी
कर्माचा त्वा धनी
तुच तुझा...!!१!!

असोनी संपत्ती
संचय धनाचा
कुणी ना कुणाचा
ईह लोकी...!!२!!

मिथ्या सारी माया
संसारी जगता
अट्टाहास करता
वाया जाई...!!३!!

म्हणे शिवा आता
सुटो मोह सारा
व्यर्थ हा पसारा
जगण्यास..!!४!!

© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता