Author Topic: अंध भक्ती ,  (Read 381 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
अंध भक्ती ,
« on: August 28, 2015, 10:46:33 PM »


मुंगीला आधार
साखर कणात
तैसी माझी गत
प्रभूदारी ||
वेड्याचे चित्त
राही भटकत
सदैव शोधत
चाळा काही ||
जया ज्यात सुख
तया ते कौतुक
भरपोटी भूक
कुणा लागे  ||
डोळस का अंध
कळेना मजला
प्रेमात मातला
भक्तीभाव ||
तुम्ही ज्ञानवान
सुक्ष्म बुद्धिवंत
बालका खेळात
रमू द्यावे ||
इतुके मागणे
मान्य करुनिया
गेला तरी वाया
जावू द्यावे ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


 

 


Marathi Kavita : मराठी कविता