Author Topic: ध्यान  (Read 423 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,276
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
ध्यान
« on: September 04, 2015, 08:33:46 AM »
ध्यान

रमता संसारी । करोनी परमार्थ   
होई साध्य स्वार्थ । भक्तीचाही...!!१!!

काया वाचे मनी । करोनिया ध्यान
दिसे नारायण । अंतर्यामी...!!२!!

जैसे समाधान । कष्टांचिया ठायी
पुंडलिका पायी । तैसे सुख...!!३!!

संताच्या सांगाती । सुखाचे आगार
भेटे परमेश्वर । नित्य तेथे...!!४!!

म्हणे शिवा आता । सोड अहंकार
व्यर्थ अवडंबर । मी पणाचे...!!५!!

© शिवाजी सांगळे 🎭

Marathi Kavita : मराठी कविता