Author Topic: कमरेवरचा हात  (Read 458 times)

Offline Dineshdada

  • Newbie
  • *
  • Posts: 37
कमरेवरचा हात
« on: October 09, 2015, 10:37:32 AM »
कमरेवरचा हात तुझा,काडशील का रे विट्ठला
अंधश्रद्धेच्या भक्ति मधुनि काडशील का रे मला

अनाथाचा नाथ तूची,धावशील का हाकेला
येईल नाचत वर्षाला,तुझ्या अकाडि वारिला

पांडुरंग पांडुरंग नाम सदा असे मुखाला
तुलाच मारीतो हाक,माझ्या सुख दुःखाला

चुकवत नाही पांडुरंगा,तुझ्या गोड भजनाला
तरी का रे दुःख असते,माझ्या या जीवनाला

दुनया सारी झाली वेडी,पुजती या दगडाला
गोर गरीब तळतळती रे,भाकरीच्या तुकड्याला

नवस करती पाहून सारी,तुझीया सावळ्या मुखड्याला
हिवाळा असो पावसाळा,गरब झोपतो उघड्याला

धया दुधाची नाजुक धार,लागते तुला न्हायाला
गोर गरीबाच्या लेकराला,पाणी ही मिळत नाही पियाला

कमरेवरचा हात काड आता तरी,आशीर्वाद तुझा द्यायला
लाज वाटल नायतर या भक्ताला,नाव तुझ घ्यायला

स्वर्गा परी सुख लागो,तूझ्या घडवील्या सृष्टीला
सर्वानवर्ति माया तुझी,सारखी असो दृष्टीला

लाउन लाइन भक्त सारी,येतात तुझ्या भेटीला
दर्शना साठी तुझ्या विठ्ठला,फाड़ावे लागते पावतीला

मस्तक ठेवन्या आधीच देवा,धरतय पुजारी मानला
आलास म्हणे दर्शना भक्ता,ओवाळणी कर देवला

किती सहन करायच देवा,तुझ्या या अन्यायाला
लाज वाटते आता विठ्ठला,दारात तुझ्या यायला

विटे वरुणी खाली उतरून,दाखव साऱ्या जगाला
किती बोलू सांग आता,दुःख वाटतय मनाला

वाहतो तुला मनो भावे,जो तुळशीच्या पानाला
सुखी राहुदे पांडुरंगा,त्याच्या लेकरा बाळाला

विणवनी करतो सांग,कळ लागते का तुझ्या जीवाला
क्षण भरा साठी तरी विठ्ठला,आराम दे तुझ्या कमरला

काहीच अर्थ राहिला नाही,अश्या या जगन्याला
विश्वासच बसत् नाही विठ्ठला तुझ्या नीरदई  वागण्याला

दगड़ा मातीचा देवा तू,सावरशील का आमाला
येउदे हाक माझी आयकु,तुझिया अंतकरणाला
                     रचनाकार
          🙏दिनेश दिलीप पलंगे🙏
                7738271854

Marathi Kavita : मराठी कविता